अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी उद्या रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

Berojgari 1

जळगाव प्रतिनिधी । कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्यातील अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी इकरा सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, एच.पी.पेट्रोल पंपामागे, नॅशनल हायवे क्रमांक 6 मेहरूण येथे 18 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्यास मुद्रा बँक योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी अल्पंसख्यांक उमेदवारांसाठी कर्ज योजना, कौशल्य विकास कार्यक्रम इत्यादिबाबत मार्गदर्शन / तज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी अल्पसंख्यांक उमेदवारांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहून रोजगाराविषयी तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन, सहाय्यक संचालक,कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content