ड्रग्स तस्करीसाठी गरजू, निराधार महिलांचा वापर

 

 

मुंबई :   वृत्तसंस्था । ड्रग्स विरोधात एनसीबीने मोठी कारवाई सुरू केली आहे. यामुळे आता ड्रग्स माफियांनी आपला मोर्चा वेगळ्या मार्गावर वळवला आहे . ड्रग्स माफिया आता हवाई मार्गाचा वापर करत आहे. तस्करीसाठी गरजू, निराधार महिलांचा वापर केला जात असल्याचं तपासात उघड झालंय

 

एनसीबीने काल मोठी कारवाई केली  मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली. यावेळी तिच्याकडे ३ किलो हेरॉईन सापडलं. या महिलेचं नाव खनियांसिले प्रॉमिसे अस आहे. ती दक्षिण आफ्रिकेची आहे. ती जोहान्सबर्ग, दोहा या मार्गाने मुंबईत आली होती. या मार्गाने कधी ड्रग्स येत नाही. हे हेरॉईन अफगाणिस्तान येथील आहे. अफगाणिस्तान येथून भारतात येणाऱ्या ड्रग्सचा मार्ग अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि त्यानंतर भारताच्या सीमेतून हे ड्रग्स भारतात यायचं. त्याच प्रमाणे समुद्र मार्गेही यायचं.

 

 

. काही दिवसांपूर्वी पंजाब सीमेतून भारतात ड्रग्स पाठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ड्रग्स माफियाचा गोळीबारात मृत्यू झाला होता. यावेळी मोठया प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं. त्याच प्रमाणे समुद्रातही मोठी कारवाई करून ड्रग्स जप्त केलं आहे.

 

ड्रग्स माफिया स्वतः पुढे न येता आता निराधार महिलांचा वापर करत आहेत. दक्षिण आफ्रिकन महिला खनियांसिले प्रॉमिसे ही देखील निराधार आहे. तिला दोन मुलं आहेत. एक मुलगा सात वर्षाचा, तर एक चार वर्षाचा आहे. ती एकल पालक आहे. त्यामुळे तिला पैशाची गरज होती.

 

महिलेची पैशांची गरज ओळखून ड्रग्स माफियांनी तिचा वापर ड्रग्स कॅरियर म्हणून केला. तिच्याकडे ड्रग्सची बॅग दिली आणि तिला भारतात पाठवलं. तिला कोणाला भेटायचं आहे, कोणाला ड्रग्स द्यायचं आहे हे काहीच माहिती नव्हतं. मात्र, ती आता पकडली गेल्यावर तिला कुणीही फोन केलेला नाही. यापूर्वीच्या कारवाईत अशाच प्रकारे एकल पालक असलेल्या महिला, गंभीर आजारी महिला यांचा वापर ड्रग्सच्या तस्करीसाठी केला जात असल्याचं उघडकीस आलं आहे.

Protected Content