धरणगाव तालुक्यातून शेतकऱ्यांची दुचाकी लांबविली

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात सल्याने येथून शेतकऱ्यांची दुचाकी चोरीची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, भगवान सुरेश पाटील (वय-३४) रा. सल्याणे खुर्द ता. धरणगाव जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वस्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. ६ ते ७ मार्च दरम्यान त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ एएच २८२१) त्यांच्या घरासमोर पार्कींग करून लावली होती. अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कोठेही आढळून आली नाही. अखेर यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाई दिपक पाटील करीत आहे.

Protected Content