डॉ. अंकुर झंवर सिंगापूर येथे “द अचीवर्स अवार्ड-२२” ने सन्मानित

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील प्राईम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मधील हृदयरोग विशेषज्ञ डॉ. अंकुर अनिल झंवर यांना नुकताच सिंगापूर येथे “द अचीव्हर्स अवॉर्डस – २०२२” ने सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. अंकुर झंवर यांनी आतापर्यंत “इंटर्वेंशनल कार्डियोलॉजी” या विषयात केलेल्या भरीव कामगिरी व दिलेल्या योगदानामुळे हा मानाचा असा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांनी एवढ्या कमी वयात १० हजार पेक्षा जास्त कार्डियाक अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या करण्याचा जणू एक नवा किर्तीमानच स्थापित केला आहे. या सोबतच भारतातील सर्वात तरुण ५० हृदयरोग विशेषज्ञ यामध्ये देखील त्यांनी आपले नाव दाखल केले आहे. त्यासाठी त्यांचे जळगाव जिल्ह्यातील व पाचोरा, भडगाव, जामनेर या तालुक्यातील आणि संबंधित पंचक्रोशितुन विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Protected Content