डीएमके सत्तेत आल्याने महिलेने जीभ कापून नवस फेडला

चेन्नई:  वृत्तसंस्था । रामनाथपूरम जिल्ह्यात  डीएमके समर्थक महिलेने डीएमकेला अभूतपूर्व यश मिळाल्याने मंदिराबाहेर जीभ कापली आहे. डीएमकेची सत्ता येण्यासाठी या महिलेने नवस केला होता. तो फेडण्यासाठी तिने हे कृत्य  केलं .  महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले  

वनिथा असं या 32 वर्षीय महिलेचं नाव आहे. ही महिला परमाकुडी येथे राहते. तिच्या नवऱ्याचं नाव कार्तिक आहे. डीएमकेला बहुमत मिळाल्यानंतर आज सकाळी ही महिला मंदिरात गेली. तिला मंदिरात देवाच्या प्रतिमेसमोर जीभ कापून नवस फेडायचा होता. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तामिळनाडूत कडक निर्बंध लागू आहेत. मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांमध्ये जाण्यासही मज्जाव करण्यात येत आहे. वनिथा मंदिराजवळ गेली तेव्हा मंदिराचा गेट बंद  दिसले . मात्र, कोणत्याही परिस्थितीत नवस फेडायचा असल्याने तिने मंदिराच्या गेटवर उभं राहूनच जीभ कापली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्याने ती मंदिराबाहेरच बेशुद्ध होऊन पडली.

 रक्तबंबाळ अवस्थेत काही लोकांनी पाहिले. त्यामुळे लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तामिळनाडूत राजकीय नेते आणि सेलिब्रिटींवर  लोक वेड्या सारखं प्रेम करतात. आपल्या नेत्यासाठी अनेक कार्यकर्ते मुंडन करून फिरत असतात. विशेष करून तामिळनाडूतील लोक डीएमके आणि एआयएडीएमके या दोनच प्रमुख पक्षांवर सर्वाधिक प्रेम करतात. 5 डिसेंबर 2016 रोजी एआयएडीएमकेच्या नेत्या जयललिता यांचं निधन झालं होतं. या धक्क्याने 30 लोकांनी प्राण सोडले होते.

तामिळनाडू विधानसभेत मोठा उलटफेर झाला आहे. सत्ताधारी एआयडीएमके ला मोठा झटका बसला आहे. डीएमकेने एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केली. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक झाली. डीएमकेने यापैकी 133 जागांवर आघाडी मिळवली तर सत्ताधारी एआयडीएमकेला 78 जागांवर आघाडी घेता आली. अन्य 1 असं चित्र तामिळनाडूत पाहायला मिळालं.

Protected Content