पुणे (वृत्तसंस्थ) या वर्षाच्या अखेरिस अर्थात डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला भारताला आपली कोरोनाची लस मिळणार असल्याचा दावा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरूवातील आपली कंपनी कोरोनावरील लस लाँच करणार असल्याचे अदर पूनावाला म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये कोरोनाच्या लसीची चाचणी सुरू करण्यात येणार आहे. ही चाचणी आयसीएमआरसोबत करण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस आम्ही लसीचे उत्पादन सुरू करणार आहोत, असेही पूनावाला म्हणाले. पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.