नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतीय रिझर्व्ह बँक २०२१ मध्ये एनबीएफसी तसंच डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मसाठी लोकपाल योजना आणणार आहे, ही घोषणा शक्तीकांता दास यांनी केली आहे. ग्राहकांच्या समस्येचं निवारण लगोलग व्हावं, यासाठी ही घोषणा केली गेली आहे.
पेटीएम-गुगप पे यांसारख्या डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म अनेक वेळा ग्राहकांना निराश करतं. कधी अधिकचे पैसे कट होतात तर कधी मनासारखी सेवा मिळत नाही. अनेकदा ग्राहकांना अश्या प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु आता आरबीय नवीन धोरण आखण्याचा विचारात आहे. दस्तुरखुद्द आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
आयरबीआय ग्राहकांच्या तक्रारींसाठी ऑनलाईन बेससाईटवरुन उपलब्ध आहे. या पोर्टलवर बँक तसंच वित्तीय कंपन्या यांच्यासंबंधी समस्येचं निराकरण ऑनलाईन करता येणार आहे. तक्रार करतावेळी आपल्याला बँकेची पूर्ण माहिती द्यावी लागेल तसंच नाव, पत्ता, मोबाईल नंबर द्यावा लागेल.
आरबीआयने सर्व डिजिटल ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्मवरील तक्रारी दूर करण्यासाठी 24 ×7 हेल्पलाईन सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अशी जर हेल्पलाईन सुरु केली तर या प्लॅटफॉर्मवर चांगली सेवा मिळेल, अशी आरबीआयला आशा आहे. त्याचबरोबर ग्राहकांचा विश्वासही वाढेल. ही वेबसाईट आर्थिक आणि मानव संसाधन या दोन्हीवरची असलेला खर्च कमी करेल.
भारतात तीन लोकपाल योजना आहेत, बँकिंग लोकपाल योजना नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठीची लोकपाल योजना व डिजीटलसाठी लोकपाल योजना… रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची २० हून अधिक लोकपाल कार्यालये देशभरातील ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे काम करतात.
तक्रारींसाठी पहिले सीएमएस पोर्टल आहे. परंतु नवीन पोर्टलचा थेट ग्राहकांना फायदा होईल. बँका, एनबीएफसी आणि बिगर बॅंकांच्या प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सचे ग्राहक लवकरच केंद्रीय पोर्टलवर आपल्या तक्रारी नोंदवू शकतील.
एसबीआयसह सर्व सरकारी आणि खासगी बँका ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही तक्रारी नोंदवतात. हे ऑफलाइन फॉर्म, एसएमएस किंवा कॉलद्वारे केले जाऊ शकते. आपण या पद्धतींद्वारे डेबिट कार्ड संबंधित समस्यांद्वारे तक्रार देखील दाखल करू शकता
बँक आपल्याला असमाधानकारक सर्विस देत असेल तर आपण आता एसएमएसद्वारेही तक्रार करु शकता. आपल्याला ‘UNHAPPY’टाईप करुन 8008202020 या नंबरवर तो मेसेज टाईप करायचा आहे. मेसेज केल्यानंतर आपल्याला बँक कर्मचाऱ्यांचा कॉल येईल आणि आपल्याला समस्येचं निराकरण होईल. यासाठीचा टोल फ्री नंबर 1-800-425-3800/1-800-11-22-11 हा आहे.