ज्योतिरादित्यांच्या जाण्याने काँग्रेसचे नुकसान- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई प्रतिनिधी । ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसची हानी होणार असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. यामुळे मध्यप्रदेशातील कमलनाथ यांचे सरकार गडगडणार असल्याचे संकेतदेखील मिळालेले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना या प्रकरणावर भाष्य केले आहे. याप्रसंगी ते म्हणाले की, शिंदे यांच्या मनात अनेक दिवसांपासून धुसफूस होती. त्यांना मध्य प्रदेश काँग्रेसचं अध्यक्ष व्हायचं होतं. मात्र, ती संधी मिळाली नाही. लोकसभेत पराभव झाल्यामुळं ते प्रचंड निराश होते. त्यांचा दिल्लीशीह संबंध तुटला होता. त्यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा होती. मात्र, तीही पूर्ण झाली नाही. त्यामुळं त्यांनी वेगळा निर्णय घेतला असावा. त्यांचा राजीनामा हा पक्षासाठी नि:संशय मोठा धक्का आहे. त्यामुळं पक्षाचं नुकसान होणार आहे. ते टाळता आलं असतं का मला माहीत नाही असे चव्हाण म्हणाले.

Protected Content