रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील वनपरिक्षेत्र विभागातून अवैधरित्या डिंकाची तस्करी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकींसह १ लाख रूपये किंमतीची १४० किलो डिंक हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील वनपरिक्षेत्र विभागातून अवैधरित्या डिंकाची तस्करी होत असल्याची माहिती वनसरंक्षक दिगंबर पगार, उपवनसंरक्षक यावल विवेक होंसिंग, यावलचे सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांनी त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सापळा रचून अहिरवाडी रावेर रस्त्याने अवैध गौण वनउपज (सलई डिंक) वाहतूक करणारे दोन मोटार सायकल क्र.(एमएच १९ सीके ०४४७) व दुसऱ्या (एमएच २० बीयू ३४२५) वर किंमत ७० हजार रुपये किमत तसेच ३० हजार रुपये किमतीचा १४० किलो सलाई डिंक किंमत असा एकूण १ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(ब)42 52 नुसार अहिरवाडी प्र. रि. क्र.02/2023 अन्वये जप्त करून आरोपी नजीर अन्वर तडवी आणि संजु बिराम तडवी दोन्ही रा. कुसुंबा ता. रावेर यांना अटक करण्यात आली. सदर कार्यवाही रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, अहिरवाडी वनपाल राजेंद्र सरदार, वनरक्षक जिन्सी रमेश भुतेकर यांनी संयुक्त रित्या केली. पुढील तपास वनपाल अहिरवाडी करीत आहे..