शहरात पडलेला दरोडा हे यावल पोलिसांचे अपयश; काँग्रेसचे जलील पटेल यांचा आरोप

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातोद येथे भरदिवसा रस्त्यावर लुट आणि आज सफार दुकानात दरोडा पडला असून यावल पोलिसांचे कुठलेही भय चोरट्यांमध्ये नसल्याचे दिसत आहे. स्थानिक पोलीस  प्रशासनाच्या अशा प्रकारच्या कार्यपद्धती उच्च स्थरावर लक्षात आणू देण्यासाठी आमरण उपोषण करु, असा इशारा काँग्रेस सेवा फाऊॅडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी दिला आहे.

यावल शहरात भर दुपारी  बाजारपेठेत वर्दळीच्या ठिकाणी खुलेआम सोन्या चांदीच्या दुकानात दरोडा पडतो आणि यावल पोलीस स्टेशन येथील काही अधिकारी हे फक्त सट्टा, पत्ता , देशी विदेशी हातभट्टी दारू विक्रीला समर्थन करून हफ्ते वसुलीच्या नादात मग्न असतात , पोलीसांच्या अशा  प्रकाराच्या कार्यपद्धीती…मुळे गुन्हेगारांना व चोरट्यांना  पाठबळ मिळत आहे कायदा आणि सुवेवस्था हाताळण्यात यावल पोलीस स्टेशनचे काही अधिकारी हे सपशेल अपयशी ठरत असून त्यांच्यावर योग्य ती चोकशी करून कठोर कार्यवाही करावी अन्यथा उपोषणाला बसू असा गंभीर इशारा काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा कोरपावली गावचे माजी सरपंच  जलील पटेल यांनी केली आहे .तसेच त्यांनी यावल पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून किरकोळ भाजीपाले विक्रतेसह इतर  व्यावसायिकांना कायदाचा धाक दाखवुन त्रास देत असून अवैध धंदेवल्याना मात्र पाठीशी घालत असून, अशा पद्धतीचा भेदभावचा कारभार करत आहे तरी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या अशा प्रकारच्या दूटप्पी भूमिका बाबत आपण तात्काळ  लिखितपत्राद्वारे तक्रार मुखमंत्री  उद्धव ठाकरे , गृहमंत्री ना . दिलीप वळसे पाटील तसेच काँग्रेस कमेटीचे प्रदेश अध्यक्ष नानाजी पटोले यांच्याकडे करणार असल्याचे जलील पटेल यांनी संगीतले आहे .

 

Protected Content