जळगाव राहूल शिरसाळे । तालुक्यातील शेतकर्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज जोडणी तोडली जात आहे. याच्या निषेधार्थ तालुका भाजपने आज नायब तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
भाजपा निवेदनाचा आशय असा की, जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता शेतातील विजेचे ट्रान्सफर्मर बंद केले जात आहे. सध्या तापमानातही वाढ होत असून टरबूज, केळी, गहू, हरभरा या सारखी नाजूक पिके शेतात असतांना यांना पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष गोपाल भंगाळे यांनी केला. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या वीज संदर्भात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला नाही तर भाजपातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही श्री. भंगाळे यांनी यावेळी दिला. निवेदन देतांना तालुका सरचिटणीस संदीप पाटील, सचिन पाटील, ईश्वर मराठे, सुदाम राजपूत, सुनील लाड, रघुनाथ पालवे, रामकृष्ण पोळ, अमोल चौधरी, निलेश साळुंखे, गिरीश वराडे, सचिन पवार, भरत ठाकरे, सुधाकर ढाकणे, राजेंद्र पाचपांडे, जितेंद्र महाजन आदी उपस्थित होते.