टॅंकरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील नांदगाव रोडवर भरधाव टॅंकरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील नांदगाव रोडवरील तळेगाव जवळील खंडेराव माथाजवळ भरधाव टॅंकरने (क्र. एम.एच.२८ एबी ७३२१) दुचाकीला (क्र. एम.एच.१९ बीटी ७९२३) जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील शिंदी येथील अंबादास धर्मा पाणसरे (वय-३२) या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२:४० वाजताच्या सुमारास समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान आरोपी गणेश सुर्यभान सोनूने रा. सोयगाव जि. बुलढाणा यांच्या विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ व मो.वा.का. कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भालचंद्र पाटील हे करीत आहेत.

Protected Content