टिम इंडियाने एक दिवसीय मालिकाही जिंकली

मेलबर्न । टिम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवून एक दिवसीय मालिकादेखील २-१ अशी सहजपणे आपल्या खिशात घातली.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला १५ धावांवर रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. रोहितने ९ धावा केल्या. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने डाव काहीसा सावरला मात्र शिखर २३ धावांवर बाद झाला. धोनी आणि विराटने संयमी खेळी करत भारताला शंभरीपार नेले. विराट ४६ धावा करून बाद झाला. त्यानंतर धोनीने केदार जाधवच्या साथीने भारताचा विजय साकारला. या दोघांनीही १२१ धावांची भागिदारी रचली. धोनीने ११४ चेंडूत ८७ आणि केदार जाधवने ५७ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. यामुळे भारताने आता कसोटीच्या पाठोपाठ एकदिवसीय मालिकादेखील जिंकून आपल्या वर्चस्वाची द्वाही फिरवली आहे.

Add Comment

Protected Content