जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई.सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी जयंती निमित्त “श्यामची आई प्रश्न मंजुषा” ऑनलाईन घेण्यात आली. इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना श्यामची आई या पुस्तकातील दहा रात्रींचे कथाकथन ऐकवण्यात आले. त्यानंतर ३०गुणांची ऑनलाईन प्रश्र्न मंजुषा घेण्यात आली.
सुरवातीला मुख्याध्यापक डी.व्ही चौधरी यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला . दामोदर धनंजय चौधरी या विद्यार्थ्याने “सानेगुरुजींच्या गोड गोष्टी” या पुस्तकातील एका गोष्टीचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रतिभा लोहार, वर्षा राणे, सी.बी.कोळी यांनी केले.
श्यामची आई प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
इयत्ता आठवी :- प्रथम क्रमांक:-कृष्णगिरी प्रमोदगिरी गोसावी, द्वितीय क्रमांक:-सुजल प्रदीप चौधरी, तृतीय क्रमांक विभागून:- पद्मिनी आनंदराव जाधव, चैतन्य निळकंठ खाचणे
इयत्ता ९वी:- प्रथम क्रमांक:-कनिष्का विजय चौधरी, द्वितीय क्रमांक:- तुषार धनराज घोडके, तृतीय क्रमांक:-प्रियंका सुधाकर भारुडे.
इयत्ता १०वी:- प्रथम क्रमांक:-दिशा नितीन चौधरी, द्वितीय क्रमांक:-हर्षल सुरेश पाटील., तृतीय क्रमांक:-कृतिका मुकेश साळी.