के.सी.ई.च्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात साने गुरुजी यांना अभिवादन

जळगाव प्रतिनिधी । के. सी. ई. सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकाकडून मातृहृदयी साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून के.सी.ई.सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीपकुमार केदार व उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून डॉ.राणे सरांनी मातृहृदयी साने गुरुजी यांच्या अतुलनीय कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.निलेश जोशी, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण कोल्हे, डॉ.गणेश पाटील, मोहन चौधरी, संजय जुमनाके, विजय चव्हाण, विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content