जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)१३ जुलै रोजी १३ चांद्रयान ३ लॉन्च करणार आहे. या अनुषंगाने ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय, मराठी विज्ञान परिषद जळगाव विभाग, महात्मा गांधी मिशन ए.पी.जे. अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्र संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने झांबरे विद्यालयात चांद्रयान तीन पेपर मॉडेल मेकिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आला.
महात्मा गांधी मिशन ए. पी.जे. अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक वैज्ञानिक श्रीनिवास औंधकर यांनी सुरुवातीला चंद्रयान 3 संदर्भात पीपीटी सादरीकरण करून माहिती दिली त्यानंतर विद्यार्थ्यांना पेपर मॉडेल तयार करण्यासंदर्भात सूचना देऊन विद्यार्थ्यांकडून पेपर मॉडेल तयार करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावीचे 103 विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रवींद्र मोरे, सिद्धेश औंधकर मराठी विज्ञान परिषदेचे प्राध्यापक दिलीप भारंबे प्राध्यापक नेहते, विद्यालयाचे शिक्षक महेंद्र नेमाडे, पूनम कोल्हे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग राणे यांनी केले.