ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात

 

मुंबई : वृत्तसंस्था । ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

९८ वर्षांचे दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील नॉन कोविड वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास  होता तसेच त्यांचे रुटिन चेकअप करायचे असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांनी दिली आहे.

 

 

यापूर्वी मे महिन्यात दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण नेहमीच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होते.

 

Protected Content