जळगावात फडणवीस,खडसे आणि महाजनांनी केली एकत्र न्याहरी !

devendra fadnvis at jalgaon after khadse mahajan meet

जळगाव (प्रतिनिधी) माझे तिकीट देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळे कापले गेल्याचा गंभीर आरोप करून खळबळ उडवून देणारे भाजपमधील नाराज नेते एकनाथराव खडसे यांनी आज दोघांसोबत सकाळी जैन हिल्सवर एकत्र न्याहरी केली.

 

धुळे, नंदुरबारमधील जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जळगावात आज सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते. यावेळी एकनाथराव खडसे वगळता भाजपचे सर्व आमदार खासदार फडणवीस यांच्या भेटीला आले होते. परंतू खडसे हे भेटीला येणार असल्याचा निरोप येताच फडणवीस यांनी हेलिकॉप्टरचे उड्डाण 20 मिनिटे उशिरा केले. त्यानंतर खडसे, महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 20 मिनिटे एकत्र बसून चर्चा केली. या बैठकीत खडसेंची नाराजी दूर करण्याबाबत चर्चा झाल्याचे कळते.

Protected Content