नोव्हेंबर महिन्यात राज्यात ३०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

70297649

 

मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिन्यात इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची गेल्या चार वर्षातील ही पहिलीच वेळ आहे.

 

नोव्हेंबरमध्ये सत्ता स्थापनेसाठी शह-काटशहाचा खेळ सुरू असताना राज्यात मात्र ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अवकाळी पावसातून झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून गेल्या चार वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत एका महिन्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा हा आकडा सर्वाधिक आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे लक्षात येते. अवकाळी पावसामुळे राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तसेच अवकाळी पावसामुळे जवळपास ७० टक्के पिकांचे नुकसान झाले. याआधी २०१५ मध्ये ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

Protected Content