फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘Blockchain Technology’ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा नुकतेच घेण्यात आली.
याप्रसंगी कार्यशाळेसाठी कुशल मार्गदर्शक म्हणुन पुण्यातील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील कॉम्प्यूटर विभागचे प्रा.एच.ई.चौधरी यांची ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लाभली.
सदर कार्यशाळेस ऑनलाईन पद्धतीने प्राचार्य डॉ. एस.डी. लोखंडे, उपप्राचार्य डॉ. वाय.पी.रेड्डी, कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉ. एन.पी. वानखेडे, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वडगांव बु, पुणे तसेच प्राचार्य डॉ. आर डी. पाटील, अकेडेमिक डिन. डॉ. पी.एम.महाजन, कॉम्प्युटर विभाग प्रमुख. डॉ. के.एस. भगत यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जे. टि. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फैजपुर उपस्थित होते. या कार्यशाळेचे नियोजन कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉ. के.एस. भगत यांच्या मार्गदर्नाखाली प्रा. व्ही.एम. होले. यांनी केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए.बी. नेहते यांनी केले.