भक्ती हाच सर्वात श्रेष्ठ मार्ग : लोकेशानंद महाराज

शेंदुर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भक्ती मार्ग हाच सर्वात श्रेष्ठ मार्ग असल्याचे प्रतिपादन श्री लोकेशानंद महाराज यांनी केले. ते येथील भागवत कथेमध्ये बोलत होते.

लोकेशानंदजी महाराज यांचे शेंदुर्णी येथे कथा वाचन सुरू आहे. यात दुसर्‍या दिवशी ते म्हणाले की, जिवनात जो भक्ती करत नसेल त्याचे जिवन व्यर्थ आहे .आपल्याकडे सर्व सुख जरी असेल तरी त्याला भक्ती मार्गची जोड लावणे आवश्यक आहे तरच जिवन सार्थकी लागेल. भक्ती करत असतांनाही नुसतेच भरकटत जाऊ नका योग्य देवाची उपासना केली तरच भक्ती करण्याला अर्थ आहे. भक्ती केल्याने कुंटुबात आनंद व सुसंस्कृत पिढी निर्माण होते . म्हणून प्रत्येकाने जिवनात सत्संग करणे गरजेचे आहे असा उपदेश त्यांनी दिला.

लोकेशानंदजी महाराज यांनी आपल्या मधुर वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले .भगवान विष्णू म्हणजेच नारायण यांनी जे दशावतार धारण केले होते ते परशुराम अवतार, मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वराह अवतार ,नरसिंह अवतार, वामन अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार, व कल्की अवतार या दहा अवतारांची माहिती कथेतून दिली . कथा समाप्ती नंतर २१ जोडप्यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली. यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. कथा श्रवण करण्यासाठी शेंदुर्णी सह पंचक्रोशीतील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content