महापालिकेतील नामनिर्देशीत नगरसेवकांची संख्या वाढणार !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रीमंडळाने आज महापालिकांमधील नामनिर्देशीत सदस्यांची संख्या वाढविण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने नामनिर्देशित सदस्यांची संख्या सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगरपालिका अधनियमाच्या कलम ५ (१) (ब) मध्ये दहा नामनिर्देशित सदस्य व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ (२) (ब) मध्ये दहा टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाहीत किंवा दहा पालिका सदस्य, यापैकी जे कमी असेल अशी सुधारणा करण्याचा तत्वत: निर्णय घेण्यात आला. याबाबत महाधिवक्ता यांचा अभिप्राय घेण्यात येणार आहे.
सध्या महानगरपालिकांतील नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांची संख्या पाच आहे.

राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या व शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणार्‍या व्यक्तींची निवड नामनिर्देशित सदस्य म्हणून केली जाते. आता हीच संख्या वाढणार आहे.

Protected Content