जुन्या वादातून दोन कुटुंब एकमेकांना भिडले

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील गलवाडे येथे गेल्या २ वर्षांपूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून २ कुटुंबामध्ये तुफान हाणामारी करण्यात आली. यात दगड, लाठ्या काठ्या व लाथाबुक्क्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. यात दोन्ही कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले आहे. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात दोघी कुटुंबातील एकूण २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारवाड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील गलवाडे येथील दुर्गाबाई नानूभिल आणि कल्पना राजू सैंदाणे यांनी दिलेल्या वेगवेगळ्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षांपासून दोन कुटुंबामध्ये वाद आहे. २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गलवाडे गावात या दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी अंगणात येऊन एकमेकांना लाथा चापटा, बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यात हातात कुऱ्हाड, लाठ्या काठ्या, दगड घेऊन एकमेकांवर वार केले. यामध्ये तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्पना सैंदाणे, लता सैंदाणे, संदीप शिरसाठ, श्याम सैंदाणे, सोनू सैंदाणे, तेजस बच्छाव, लक्ष्मी सैंदाणे, नीला सैंदाणे, अक्षय बच्छाव, किरण बच्छाव, नाना सैंदाणे, गणेश मालचे, सुखदेव पाटील, अजय भिल, विकी भील, विजय भील, दुर्गाबाई भिल, उषा भिल, पंकज मालचे, संजय भिल, सावित्राबाई भिल असे एकूण २१ जणांविरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहे.

 

 

Protected Content