यावल, प्रतिनीधी | तालुका “जुक्टो संघटना मेळाव्यात’ आज नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्षपदी प्रा.एच. पाटील तर सचिवपदी हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
यावल येथे आज “जुक्टो संघटना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्याअनुषंगाने तालुका अध्यक्षपदी प्रा.एच. पाटील तर सचिवपदी हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी जळगांव जिल्हा ज्युक्टो संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, सरचिटणीस प्रा.सुनील सोनार, प्रा.श्रीकांत जोशी, प्रा.निवृत्ती वाणी, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा.अनिल सोनवणे यांच्यासह वसंघटनेचे पदधिकारी उपस्थित होते. सदर मेळावा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या सभेत यावल तालुका नूतन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. या मेळाव्यात “ज्युक्टो सभासद जोडो अभियानात”सर्व ज्यु.कॉलेजच्या प्राध्यापक बंधू-भगिनी यांनी सभासद व्हावे, शिक्षकांना असणाऱ्या समस्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली, सदरहू समस्या जिल्हासंघटनेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे ठरविण्यात आले. दरम्यान प्रा.नंदन वळींकार व सचिव प्रा.सुनील सोनार यांनी मेळाव्यात योग्य असे मार्गदर्शन केले. प्रा.दिलीप बोदडे यांनी शिक्षकांना येत असलेल्या समस्या मांडल्या. सूत्रसंचालन प्रा.अनिल सोनवणे तर आभार प्रा.गणेश पाटील यांनी केले.
नुतन कार्यकारिणी
यावल तालुका अध्यक्ष प्रा.एच. डी.पाटील साने ( गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय, यावल) उपाध्यक्ष प्रा.नितीन पाटील (म्युनिसिपल हायस्कूल व ज्यु.कॉलेज, फैजपूर) चेतना चौधरी (पी.एस.एम.एस कनिष्ठ महा. बामणोद) तर सचिवपदी हेमंत प्रकाश पाटील (प्रभात विद्यालय हिंगोणे ), सहसचिव- कैलास वाघूळदे (भारत कनिष्ठ महा. न्हावी), जेष्ठ मार्गदर्शक- प्रा.श्रीकांत जोशी (सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय यावल), कार्याध्यक्ष- प्रा.उत्पल चौधरी, (फैजपूर) , खजिनदारपदी प्रा.एन.सी.वाणी, अट्रावल, प्रा.स्नेहल वाणी (साने गुरुजी क.महा.यावल),
तालुका प्रतिनिधी – प्रा.मेहमुद खान, प्रा.पी.ए.पाटील सांगवी, आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.