जि. प. सदस्या पल्लवी सावकारे यांची मतदारसंघात पाहणी

भुसावळ प्रतिनिधी । कुर्‍हे पानाचे- वराडसीम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी गटातील विविध ग्रामपंचायतींना भेट देऊन कोरोना संदर्भात करण्यात आलेले उपाय योजना व परिस्थितीची माहिती घेतली.

जि . प . सदस्या सावकारे यांनी मांडवे दिगर , भिलवडी तांडा , मुसळ तांडा , कुर्‍हे पानाचे व वांजोळा येथे भेटी दिल्या होत्या. त्यानंतर पुन्हा त्यांनी बुधवार रोजी गोजोरे, वराडसिम, बेलव्हाय, सुनसगाव येथील ग्रामपंचायतींना भेटी देऊन या गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. वराडसीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी गोजोरे येथील सरपंच योगेश चौधरी, वराडसिम येथील सरपंच प्रशांत खाचणे, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती मावळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. करुणा तायडे, योगेश चौधरी , गजानन टाक आदी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रााच्य अंतर्गत येणार्‍या १९ गावांमध्ये ५३५ नागरिक बाहेरून आले असल्याचे सांगण्यात आले. या सर्वांची तपासणी करण्यात आली असल्याचे माहिती वैद्यकीय अधिकारी तायडे यांनी पल्लवी सावकारे यांना दिली.

दरम्यान, सुनसगाव येथील ग्रामसेविका ही येतच नसल्याची तक्रार येथील सरपंच दीपक सावकारे यांच्यासह सदस्यांनी केली. आठवड्यातून केवळ एक किंवा दोन दिवस ग्रामसेविका येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Protected Content