जि.प.च्या विशेष सभेत जिल्हा पंचायत नियोजन समिती गठीत (व्हिडिओ)

जळगाव, राहुल शिरसाळे | १५ व्या  वित्त आयोग अंतर्गत मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा पंचायत नियोजन समितीची स्थापना तसेच क्षेत्रीय कार्यगट स्थापना करण्याबाबत आज विशेष सर्वसाधारण सभा जि .प. अध्यक्षा ना. रंजनाताई प्रल्‍हाद पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. या सभेत जिल्हा पंचायत नियोजन समिती गठीत करण्यात आली.

 

या ऑनलाईन सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच विभागप्रमुख अधिकारी त्याचप्रमाणे सन्मानित जि प सदस्य हजर होते.   या सभेत १५ व्या  वित्त आयोगांतर्गत  जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्याबाबत शासन निर्णय दि. १४  जून २०२१   रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या  त्यानुसार शासन निर्देशानुसार  जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करणे बाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.

शासन निर्णयानुसार जिल्हा पंचायत नियोजन समितीची रचना आहे.  यामध्ये जिल्हा परिषदेने निवडलेले प्रतिनिधी सभासद म्हणून समितीवर नियुक्त करण्यात आले.  या समिती अध्यक्षपदी  जिल्हा परिषद अध्यक्ष ना. रंजनाताई पाटील असणार आहेत या समितीमध्ये २०  जिल्हा परिषद सदस्यांची नवे देण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्यातील १ सरपंच  या प्रमाणे यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. या समितीत शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करण्यास मान्यता घेणे आवश्यक असल्याने जिल्हा परिषद सर्वसाधारण विशेष सभेत मान्यता घेणे आवश्यक आहे.  सभेचे सचिव यांनी जिल्हा परिषद स्तरावर समितीसाठी सदस्याची निवड करण्यात आली ती त्यांचे नाव वाचून दाखविली.

 

दरम्यान, या सभेबाबत जि. प.उपाध्यक्ष लालचंद पाटील व शिवसेना जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजला अधिक माहिती दिली. यात त्यांनी समिती गठन व समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य निवडीबाबत माहिती दिली.

 

समितीच्या अध्यक्षपदी  नामदार रंजना प्रल्हाद पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. तर  सदस्यपदी शिक्षण व आरोग्य समिती  सभापती रवींद्र पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योती राकेश पाटील, समाज कल्याण समिती सभापती जयपाल बोदडे,  कृषी समिती सभापती उज्वला माळगे, पोपटतात्या  भोळे,  मनोहर पाटील, शशिकांत पाटील, प्रभाकर सोनवणे, नंदकिशोर महाजन, मधुकर काटे, नंदा पाटील, अमित देशमुख, अरुणा पाटील, कविता भालेराव, पल्लवी सावकारे, प्रभाकर गोटू सोनवणे, मंगला जाधव, विद्या खोडपे, दिलीप पाटील, रजनी पाटील या जि. प.सदस्यांची निवड करण्यात आली. तर सरपंच गटातून नेहता ता. रावेर सरपंच महेंद्र पाटील, किनगाव बुद्रुक तालुका यावल सरपंच निर्मला पाटील,  मुडी प्र.डा.  तालुका अंमळनेर सरपंच काशिनाथ माळी, वाकडी तालुका चाळीसगाव सरपंच प्रकाश पाटील,  सावखेडा तालुका पारोळा सरपंच पुनम पाटील, भादली बुद्रुक तालुका जळगाव सरपंच मिलिंद चौधरी, राजुरी खुर्द तालुका पाचोरा सरपंच राहुल पाटील, पुंनगाव तालुका चोपडा सरपंच किशोर पाटील, पिंपळगाव बुद्रुक तालुका जामनेर कल्पना पाटील, नरवेल तालुका मुक्ताईनगर सरपंच मोहन महाजन,  बात्सर तालुका भडगाव सरपंच भास्कर पाटील, खडके सिम तालुका एरंडोल सरपंच विकास सोनवणे, खंडाळा तालुका भुसावळ सरपंच मीराबाई पाटील, सुरवाडे बुद्रुक तालुका बोदवड सरपंच श्रीकांत कोळी,  भामर्डी तालुका धरणगाव सरपंच सुनंदा पाटील यांची सभासद म्हणून निवड करण्यात आली.

या समितीत सभासद म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्ह्यातील पंचायत समितीचे सभापती पंधरा सभापती,  जिल्हा  नियोजन अधिकारी एक, विभागीय वनाधिकारी १, एमआरएलएमचे प्रतिनिधी १,  जिल्हा कृषी अधिकारी १,  त्याचप्रमाणे आमंत्रित सदस्य म्हणून कृषी उत्पन्न पणन समितीचे अध्यक्ष, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, स्वच्छता तज्ञ १, अर्थशास्त्राचे प्राध्यापक १ यांची नियुक्ती करण्यात येऊन समितीचे सदस्य सचिव हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत एक याप्रमाणे यांची जिल्हा परिषद स्तरावर समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3122095504687002

Protected Content