जळगावात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; ९ जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहर पोलीस ठाण्याच्या समोर एका पोलीस कर्मचाऱ्या पोलीस काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे

 

शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक किशोर निंकुभ रा. कांचननगर हे कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री निकुंभ हे त्यांचे घरी आलेले पाहुण्यांना सोडण्यासाठी बसस्थानकावर गेले होते. तेथून परत आल्यानंतर आरपीएसओ म्हणून गस्तीवर असतांना रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास टॉवर महावीर आईसक्रीम जवळ गर्दी दिसल्याने निकुंभ यांनी संबधितांना हटकले. तसेच एवढी रात्री झाली तरी कुठे फिरताय घरी जा असे सांगितले. याच राग आल्याने अमन उर्फ आशुतोष ईश्‍वर ढंढोरे, राजवीर ढंढोरे यांनी निकुंभ यांच्या दुचाकीला लावलेली पोलीस काठी काढून निकुंभ यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी राजवीर याने पकडून ठेवले तर आशुतोष ढंढोरे यांने निंकुभ यांना कंबरेवर, डोळ्यावर मारहाण केली. यात निंकुंभ यांना दुखापत झाली. पोलीस ठाण्याजवळीलच घटना असल्याने पोलीस ठाण्यातील इतर कर्मचारी घटनास्थळी धावून आले. व सोडवासोडव केली. संशयितांना पोलीस ठाण्यात घेवून येत असतांनाही संशयितांनी निकुंभ यांना मारहाण केली. याप्रकरणी रात्री उशीरा पोलीस नाईक किशोर निंकुभ यांच्या फिर्यादीवरुन  आशुतोष ढंढोरे, राजवीर ढंढोरे, माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे, संदीप ढंढोरे, विलास लोट, नितीन जावळे व इतर अशा ९ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी संशयितांपैकी  संदीप शिवचरण ढंढोरे (वय ४२) व विलास मधुकरराव लोट (वय ४५) दोन्ही रा. ब्राम्हणवाडी बळीरामपेठ या दोघांना अटक केली.

Protected Content