जिल्ह्यात ८६.७१ टक्के लसीकरणाचा टप्पा पार

 जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी –  जिल्ह्यात गेल्या वर्ष सव्वा वर्षापासून कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे आतापर्यत जिल्यात ८६.७१ टक्के लसीकरणाचा टप्पा पार पार झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोना संसर्ग काळातील पहिल्या, दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त नुकसानीची झळ जळगाव जिल्ह्याला सोसावी लागली आहे. यावर संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोविशिल्ड कोवक्सीन लस मात्रेचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील लसीकरण पात्र लोकसंख्या सुमारे ३६ लाख, ३२ हजार ४९८ असून या लसीकरण मोहिमेद्वारे आतापर्यत ३१ लाख ५० हजारांहून अधिक नागरिकांना पहिला तर २९ लाखांहून अधिक जणांना दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण लाभ देण्यात आला आहे. तर ४६ हजाराहून अधिक नागरिकांना बुस्टर डोसचा लाभ देण्यात आला असल्याचे जिल्हा लसीकरण समन्वयक डॉ पातोडे यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
जिल्ह्यात १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी 3 जानेवारीपासुन्र संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यात २ लाख २५ हजार ८९८ किशोरवयीन महाविद्यालयीन विद्यार्थांपैकी १ लाख ३० हजाराहून अधिक किशोरवयीनाना पहिल्या टप्प्यातील लसीकरण लाभ देण्यात आला आहे.
१२ ते १४ वर्षातील मुलांच्या लसीकरणासाठी प्रशासनाची बैठक
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १६ मार्च पासून १२ ते १४ वर्षातील मुलांच्या लसीकरणासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य प्रशासन विभागासह अन्य अधिकाऱ्याची बैठक घेण्यात येऊन १२ ते १४ वर्षातील मुलांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याचेही जिल्हा लसीकरण समन्वयकानी म्हटले आहे.

Protected Content