महिलेला मारहाण करून घरातील रोकडसह लांबविले सोन्याचे दागिने

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेच्या घरातील रोकडसह सोन्याची मंगलपोत व दागिने असा एकूण २ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रचना कॉलनी येथे राहणाऱ्या आशाबाई गोपाल चौधरी (वय-४२) रा. रचना कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १५ मार्च रोजी पाहटे ३ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून सुनील रसाळ राठोड, संजय रसाळ राठोड रा. कासमवाडी,  विशाल पदमसिंग परदेशी रा. कुसुंबा आणि रुपेश संजय सपकाळे रा. कांचन नगर यांनी महिलेच्या घरात घुसून मारहाण केली व घरातील सामानांची तोडफोड केली. तसेच महिलेच्या घरात ठेवलेले १ लाख रूपयांची रोकड आणि  सोन्याची मंगलपोतसह सोन्याचे दागिने असा एकुण  २ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सुनील राठोड, संजय राठोड दोन्ही रा. कासमवाडी, विशाल पदमसिंग परदेशी रा. कुसुंबा आणि रुपेश संजय सपकाळे रा. कांचन नगर या चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

 

Protected Content