दिलासा : राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसांचा रूग्णसंख्येतील घटीचा कल कायम राहिला असून काल राज्यातील कोरोनाची रूग्णसंख्या ही दहा हजारांच्या आत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, मागील २४ तासांत राज्यात ९ हजार ६६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २५ हजार १७५ जणांची कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीदरम्यान ६६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ६६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.८३ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ७५ लाख  ३८ हजार ६११  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६० टक्के आहे.  सध्या राज्यात  ७ लाख २४ हजार ७२२ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर २३९४  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत ७ कोटी ५५ लाख ५४ हजार ७९८ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत, त्यापैकी ७८,०३,७०० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

यासोबत दिलासादायक बाब म्हणजे, सलग तीन दिवसांपासून राज्यात ओमायक्रॅानचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.  आतापर्यंत ३३३४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी २०२३ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

 

Protected Content