महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची पुन्हा एकदा विटंबना

नवी दिल्ली- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमेरिकेतील मॅनहॅटन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची अज्ञातांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये दुसर्‍यांदा हा प्रकार घडल्याने स्थानिक भारतीय समुदायाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मॅनहॅटन शहरातील युनियन स्क्वेअरजवळील लॅण्डस्केप गार्डनमध्ये २००२ मध्ये महात्मा गंधीजींचा आठ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्या वेळेस गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करत तोडफोड केली आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून दुतावासाने स्थानिक प्रशासन आणि स्टेट डिपार्टमेंटकडे विनंती केली आहे. पुतळ्याची तोडफोड करणा़र्‍यांच्या विरोधात योग्य कारवाई केली जावी, असेही स्पष्ट केले आहे.

महात्मा गांधींच्या ११७ व्या जन्मदिनानिमित्त २ ऑक्टोबर १९८६ रोजी आठ फूट उंचीचा गांधी मेमोरियल इंटरनॅशनल फाउंडेशनकडून भेट दिलेला पुतळा युनियन स्क्वेअर येथे उभारला होता. त्यानंतर हा पुतळा २००१ मध्ये काढून टाकला होता. त्यामुळे २००२ मध्ये एका लॅण्डस्केप गार्डन परिसरात तो पुन्हा उभारण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याची दोनदा विटंबना करण्यात आल्याने भारतीय समुदायाने याचा तीव्र निषेध केला आहे.

 

Protected Content