काँग्रेससोबत यापुढे आघाडीची चर्चा नाही: प्रकाश आंबेडकर

4Prakash Ambedkar 5 0

 

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यापुढे आघाडीची चर्चा करणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालेय.

 

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नाही. काँग्रेससोबत चर्चेची दारे आता बंद झाली आहेत. मुंबईतील एका पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी ही घोषणा केली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मते लक्षात घेता. विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ला विशेषत: प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरू केले होते. मात्र, राष्ट्रवादीला वगळून काँग्रेससोबत युती करण्यात आंबेडकरांना रस होता. त्यासाठी त्यांनी थेट ५० टक्के जागांची मागणी काँग्रेसकडे केली होती. त्याला काँग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आंबेडकरांनी आज स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली.

Protected Content