गिरडा जंगलात आढळले शेकडो मृत कुत्रे (व्हिडीओ)

शेअर करा !

bulthana 1

 

बुलढाणा प्रतिनिधी । शहरापासून जवळच असलेल्या गिरडा जंगलात शेकडो कुत्र्यांचे मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

store advt

याबाबत अधिक माहिती अशी की, गिरडा जंगलात मेलेल्या कुत्र्यांची संख्या १०० च्या वर असून त्यांना मारण्यासाठी विषचा प्रयोग करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत कुत्र्यांमुळे परिसरातील गिरडा, पाडळी, हनवतखेड्यांसह अनेक गावांमध्ये दुर्गंधी पसरली आहे. यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. परंतू एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत कुत्रांचे शव आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेय. तर या प्राण्यांना विष देऊन मारण्यात आल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच यातील सर्व कुत्रे पाळीव असल्याचे समोर आले. याचबरोबर त्यात घटनेत कुत्र्यांच्या पिल्लांचाही देखील समावेश आहे. तसेच काहींचे हात पाय बांधलेल्या स्थितीमध्ये तर काही कुत्रे जीवित असल्याचे हि निदर्शनास आलेय. या प्राण्याच्या जीव घेण्या-या आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांना कोण मारले असावे आणि कश्यासाठी असे विविध प्रश्न नागरिकांकडून उपस्थितीत होत आहेत. याबाबत प्रशासनाने तत्काळ तपासणी करत यावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!