जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा चार कोरोनाबाधीत आढळून आले असून यात भुसावळ, जळगाव, अमळनेर व अडावद येथील रूग्णांचा समावेश असल्याची माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे.
जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी कोरोना चाचणीबाबतची माहिती एका प्रेसनोटच्या माध्यमातून जाहीर केली आहे. यानुसार जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 43 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 39 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चार व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील 59 वर्षीय पुरुष, अडावद, ता. चोपडा येथील 58 वर्षीय पुरुष, नेहरुनगर, जळगाव येथील 75 वर्षीय पुरुष तर अमळनेर येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 इतकी झाली असून त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील एकूण ६६ रूग्णांपैकी सर्वाधीक २८ रूग्ण हे अमळनेर येथील आहेत. या खालोखाल भुसावळात १४, जळगावात ११, पाचोरा येथे ९, अडावद येथील ३ तर मूळ मलकापूर येथील व सध्या जळगावात रहिवास असणार्या एका रूग्णाचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००