काँग्रेसतर्फे केंद्राच्या शेतकरी विधेयका विरोधात निदर्शने (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर करून नवीन आणलेल्या काळया कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असल्याचा काँग्रेसने आरोप करत या कायद्यांच्या विरोधात जिल्हा कॉंग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले .

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर केले आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी, ते बिल मागे घेण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या विधेयकांमुळे शेतकरी उद्धवस्त होईल व कंपनी राज आल्याशिवाय राहणार नाही अशी भीती जिल्हाध्यक्ष अँड.  संदीप भैय्या पाटील यांनी व्यक्त केली. मोजक्या उद्योगपतींना लाभ पोहचण्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप श्री.पाटील यांनी यावेळी केला. या बिलांमुळे भविष्यात शेतकरी, मजूर आदींची वाताहात होणार असल्याने विरोध करीत आहोत. तसेच नवीन कामगार कायद्यास विरोध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्राने शेतकरी विरोधी कायदा मागेघ्यावा तसेच उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करून योगी सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी आ. शिरीष चौधरी यांनी केली.

दि. २६ सप्टेंबरपासून भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी विधेयकांना विरोध दर्शविण्यासाठी ऑनलाईन मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. सोशल मीडिया मार्फत भाजप सरकारचा निषेध करण्याचे व सदर काळा कायदा मागे घेण्याची मागणी करण्याची मोहीम सुरू झालेली असून, २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान वेळोवेळी विविध आंदोलने छेडली जाणार आहेत. त्यात सर्व प्रथम आज महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने ‘मजदूर बचाव दिवस’ पाळला जाणार आहे . या दिवशी जिल्हा मुख्यालया मध्ये निदर्शन करून शेतकरी विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रकाश मुगदिया, जिल्हाध्यक्ष अँड. संदीप भैय्या पाटील, आमदार शिरिष चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषद गट नेते प्रभाकर सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, श्याम तायडे, ज्योत्सना विसपूते, अल्पसंख्य शहराध्यक्ष अमजद पठाण, अशोक खलाणे, अविनाश भालेराव, सुरेश पिरण पाटील, सुरेश सिताराम पाटील ,जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, श्रीधर विष्णु चौधरी, भगतसिंग पाटील, राजस कोतवाल, हितेश पाटील, जाकीर बागवान,  ज्ञानेश्वर कोळी, उद्धव वाणी, दीपक सोनवणे, जगदीश काळे ,प्रदीप सोनवणे,  मनोज सोनवणे, राजाराम पाटील, के. डी. चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, मनोज चौधरी, गोकुळ बोरसे, रतिलाल चौधरी, परवेज पठाण, अँड अमजद पठाण ,मालोजीराव पाटील,जमिल शेख ,बाबा देशमुख, रहिम कुरेशी, रविंद्र निकम, पंकज पाटील, संजय पाटील, जगदीश गाढे, विवेक ठाकरे, आरिफ सिद्धीक,नंदकिशोर सांगोरे,प्रतिभा मोरे, योगिता शुक्ल, अरुणा पाटील, छाया कोरडे, जलील पटेल,  इम्रान खान,  योगेश देशमुख, आदी पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, फ्रंटल चे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते

पुढील महिन्याभरातील आंदोलने..

तसेच १० ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय किसान संमेलन संपन्न होणार आहे. या किसान संमेलनातून ही भाजपाने केलेल्या या अन्यायग्रस्त कायद्यांच्या विरोधात आवाज उठवला जाणार आहे. तसेच २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. शेतकरी, शेतमजूर, बाजार समितीतील दुकानदार, बाजार समितीमधील कामगार, कष्टकरी यांच्या सह्यांची मोहीम राबवून दोन कोटी सह्यांचे निवेदन तयार करून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केला जाणार असून शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांच्या विरोधात जो काळा कायदा निर्माण केला आहे तो मागे घ्यावा यासाठी सर्वसामान्य माणसांना शेतकऱ्यांना सोबत घेऊन आवाज उठविला जाणार आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/545149466289787/

 

Protected Content