जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात २३ रूग्ण आढळून आले आहे. तर आज ३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. पहिल्यांदा अकरा तालुके निरंक आढळून आले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर- १४, जळगाव ग्रामीणी-२, भुसावळ-३, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०,चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-०, बोदवड-१, इतर जिल्हे-२ असे एकूण २३ रुग्ण आढळले आहेत.
२४ तासात ३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.