जिल्हा पोलीस दल व रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबिर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दल आणि रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील मल्टीपर्पज हॉल रक्तदान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ असलेल्या पोलिस मल्टीपर्पज हॉल येथे आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले

याप्रसंगी डॉ. कुमार, मुकुंद गोसावी, रेडक्रॉस सोसायटीचे उज्‍वला वर्मा, पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक बापू रोहम, पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, पोलीस निरीक्षक व्ही.डी. ससे, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक अकबर पटेल, पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक पंकज पवार, राखीव पोलिस उपनिरीक्षक श्री. शिरसाठ आदि पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यांनी केले रक्तदान
आज सकाळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांच्यासह 125 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आयोजित केलेल्या शिबिरात रक्तदान केले. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा वेळी रुग्णांना कोणताही रक्ताचा पुरवठा कमी भासू नये या दृष्टिकोनातून शिबिर घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोहेकॉ.मिलिंद केदार यांनी केले.
 
 
 

Protected Content