जळगाव प्रतिनिधी । आज संध्याकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात एकूण ५२ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यामुळे आता रूग्णांचा आकडा सोळाशेच्या उंबरठ्यावर आल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक २० रूग्ण हे भुसावळचे आढळून आले असून याच्या खालोखाल १७ रूग्ण हे जळगावचे आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण व जामनेर प्रत्येकी ३; पारोळा, एरंडोल व चोपडा प्रत्येकी २ तर अमळनेर, रावेर आणि यावल प्रत्येकी १ रूग्णांचा समावेश आहे.
आजच्या ५२ रूग्णांमुळे जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या तब्बल १५७८ इतकी झाली आहे. यातील तालुक्यानुसार कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. जळगाव शहर – २९७; भुसावळ – ३००; अमळनेर – २१७; रावेर – ११०; जळगाव ग्रामीण- ४४; भडगाव – ८९; चोपडा- १०१; पाचोरा- ४१; धरणगाव – ७४; जामनेर – ८०; यावल – ७१; एरंडोल – ४१; पारोळा- ६९; चाळीसगाव – १७
बोदवड- १२; मुक्ताईनगर – ११; बाहेरील जिल्ह्यातील- ०४