कोविड रूग्णालयात दोन कोरोना बाधीत रूग्णांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन रूग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे कोरोना बाधीतांच्या मृतांचा आकडा १६ वर पोहचला आहे.

जिल्हा कोविड रूग्णालयातील मृतांची वाढती संख्या ही अतिशय चिंताजनक बनलेली आहे. यात आता कोरोनावर उपचार घेत असलेल्या दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या मृतांची संख्या १६ इतकी झाली आहे. तर अजून काही रूग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने हा आकडा वाढण्याची भिती आहे.

दरम्यान, आज सकाळीच अमळनेर येथे पुन्हा १४ नवीन कोरोना बाधीत आढळून आले १४ नवीन कोरोना बाधीत आढळून आले असून या शहरातील संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content