जिल्ह्यात आज २२९ कोरोना बाधित आढळले; ५०३ रूग्ण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून कोवीड रूग्णांची आकडेवारी आज सायंकाळी प्राप्त झाली आहे. यात जिल्ह्यात आज २२९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेत तर ५०३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात बाधितांचा आकडा ५० हजाराच्या उंबरठ्यावर आला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर -२९, जळगाव ग्रामीण-१२, भुसावळ-१२, अमळनेर-११, चोपडा-९, पाचोरा-३, भडगाव-०, धरणगाव-५, यावल-४, एरंडोल-१, जामनेर-१००, रावेर-९, पारोळा-६, चाळीसगाव-२६, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ आणि अन्य जिल्हा १ असे एकुण २२९ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय आडेवारी
जळगाव शहर -११,३०७, जळगाव ग्रामीण-२४४०, भुसावळ-३४९३, अमळनेर-४१९६, चोपडा-४१६४, पाचोरा-१८६६, भडगाव-१८१९, धरणगाव-२१३६, यावल-१६३५, एरंडोल-२७७०, जामनेर-३६५५, रावेर-२०४८, पारोळा-२४३१, चाळीसगाव-२३९९, मुक्ताईनगर-१४८७, बोदवड-७९३ आणि अन्य जिल्हा ४०१ असे आज एकुण ४९ हजार ९४० रूग्ण झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. रिकव्हरीचा रेट हा ८९.७२ टक्क्यांपर्यंत आला आहे. जिल्ह्यात एकुण ४९ हजार ९४० रूग्ण आढळून आले असून ४४ हजार ८०५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज ३ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण जिल्ह्यात १२०९ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता ३ हजार ९२६ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content