जळगाव : प्रतिनिधी । जिल्ह्यात आज तडजोडीतून ४ हजार ५७५ दावे निकाली काढण्यात आले .
जिल्ह्यात आज सर्व तालुक्यांमध्ये लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले होते . सामोपचाराने तडजोड घडवून आणत दावे निकाली निघावे आणि पक्षकारांचे पैसे , वेळ व मनस्ताप वाचावा या हेतूने सामाजिक उपक्रम म्हणून लोक अदालतींचे आयोजन केले जाते
जिल्ह्यात आज सर्व न्यायालयांमधील दाखलपुर्व ३३८१ आणि दाखल झालेले ११९४ व विशेष बाब म्हणून ५३६ दावे तडजोडीं नंतर निकाली काढण्यात आले या निकाली निघालेल्या सर्व ४ हजार ५७५ दाव्यांमधून ३० कोटी १८ लाख ६५ हजार २१७ रुपयांची वसुली करण्यात आली
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमधील न्यायाधीश , वकील , न्यायालयामधील कर्मचारी आदी सर्व घटकांसह पक्षकारांनी सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाल्याचे सूत्रांनी सांगितले जिल्हा विधिसेवा प्राधिकरण आणि जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणावरील वकील संघांनी सक्रिय सहकार्य या लोक अदालतींच्या यशस्वीतेसाठी केले .