चाकूहल्ला करणाऱ्या संशयितांच्या मुसक्या अवळल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इथे का थांबले आहे, असे म्हटल्याचा राग येवून तिघांनी एकाला मारहाण करून चाकूने वार करून त्यांचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना पिंप्राळ्यातील राम मंदिर परिसरात घडली होती. याप्रकरणी दोन विधी संघर्षीत बालकांसह एकाला ताब्यात घेतले. मंगळवारी ४ जुलै रोजी दुपारी २ वाजता संशयिताला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली तर विधी संघर्षीत बालकांची बालसुधारगृहात रवागनी करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील राम मंदिर परिसरात निलेश दुबे हे वास्तव्यास असून त्यांच्या घरासमोरील वाळूच्या ढिगाऱ्यावर काही तरुण बसले होते. दुबे यांनी त्या तरुणांना इथे का थांबले असे म्हणले असता, त्याचा राग आल्याने त्या तिघांनी दुबे यांच्यासोबत वाद घालून त्यांच्यावर चाकूने वार करीत जखमी केले. तसेच त्यांच्या खिशातून १५ हजारांचा मोबाईल हिसकावून नेला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरुणावर वार करणारे तिघे पिंप्राळ्यातील असल्याची माहिती तपासधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांसोबत पिंप्राळा परिसरातून दोन विधी संघर्षीत बालकांसह भूषण मनोज अहिरे (वय २०, रा. विद्यानगर) याला सोमवारी ३ जुलै रोजी रात्री ८ वाजता वाजता ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हिसकाविलेला मोबाईल जप्त करण्यात आला. त्यांना मंगळवारी ४ जुलै रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात हजर केले असता, भूषण अहिरे याला दोन दिवसांची पोलीस कोठडी तर दोघ विधी संघर्षीत बालकांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहे.

Protected Content