भरधाव डंपरच्या धडकेत कंटेनर पलटी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जयभोले समोर भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत कंटेनर पलटी झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावानजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल जयभोले समोर कंटेनर (एमपी १३ जीए ६६५१) हा ट्रक जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूने भरलेला डंपर क्रमांक (एमएच १९ सी वाय ९९९२) याने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कंटेनर हा पलटी होऊन चालक जखमी झाला. हे घटना घडल्यानंतर डंपर चालक हा डंपर घेऊन पसार झाला. या संदर्भात कंटेनर चालक गुडालाल हजारीलाल चौधरी (वय-५२, रा.जबलपूर) यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवार २१ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता डंपरवरील अज्ञात चालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे करीत आहे.

Protected Content