जळगाव, प्रतिनिधी । कॉंग्रेस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ`ॅॅड संदीपभैय्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी बँकेच्या माध्यमातून जे सत्तेवर होते त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताची कामे न केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. ती उणीव भरून काढण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी स्वतंत्र पॅनल उभे करणार असल्याचे अॅॅड संदीपभैय्या पाटील यांनी सांगितले. प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी यांनी आमच्याकडे सर्व २१ मतदारसंघासाठी सक्षम उमेदवार असल्यानेच स्वबळावर लढण्याची तयारी केली असल्याचे सांगितले. जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत कॉंग्रेसला शेवटच्या क्षणी डावलण्यात आल्याने तयारीला वेळ मिळाला नव्हता, यासाठी यावेळी सुरवातीपासूनच तयारीला लागलो आहोत असे स्पष्ट करण्यात आले. याप्रसंगी डी. जी. पाटील, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, सुरेश शामराव पाटील, राजीव रघुनाथ पाटील, उदय पाटील, आर. जी. पाटील, जमील शेख, शामकांत तायडे, विजय महाजन, अशोक खलाणे, अॅड. अविनाश भालेराव, एस. टी. पाटील, विकास वाघ आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/635522144079002