महापरीक्षा पोर्टलच्या सावळा गोंधळ पाहता पोर्टल रद्द करा : डॉ. राधेश्याम चौधरी (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 08 01 at 4.32.49 PM

जळगाव, प्रतिनिधी | महापरीक्षा पोर्टलकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधील सावळा गोंधळ, सामूहिकरीत्या होणारी कॉपी, अभ्यासक्रमानुसार परीक्षा न होणे. प्रश्नांची पुनरावृत्ती यामुळे महापरीक्षा पोर्टल रद्द करावे अशी मागणी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी व्यक्त केले. त्यांच्याकडे विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली कैफियत मांडली त्यावेळी ते बोलत होते.

घोषणाबाज व कृतीशून्य असलेले महाराष्ट्र सरकारने ७२ हजार पदांपैकी ३६ हजार पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. तरी मागील २ ते ३ महिन्यापासून महापारीक्षा या पोर्टलने तसेच महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीने युवा वर्ग त्रस्त असल्याचे मत डॉ. राधेश्याम पाटील यांनी पुढे मांडले. महापरीक्षा पोर्टल हे बोगस आहे. युवा वर्गास उच्च शिक्षण घेऊन देखील जॉबसाठी महापारीक्षा पोर्टलद्वारे प्रताडणीत केले जात आहे. महापारीक्षा पोर्टलचा कारभार भोंगळ आहे. परीक्षा पद्धती बोगस आहे. एकाच विषयाची महिना महिनांभर परीक्षा चालते. वेगवेगळ्या सेटमध्ये परीक्षा घेतली जात असल्याने विद्यार्थी वर्ग त्रस्त झाला आहे. युवक आधीच बेरोजगार असतांना एकाच आस्थपनेत वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी भरावी लागते. ही वेगवेगळी फी रद्द करायाल पाहिजे. या पोर्टलद्वारे ऐजंट यांचा सुळसुळाट झाला आहे. गावोगावी ऐजंट फिरता आहेत. १८-२० लाख रुपयांची एका पदासाठीची मागणी करीत आहेत. २ लाख आधी द्या यादीत नाव आल्यानंतर उर्वरित १८ लाख द्या असे आत्मविश्वासाने सांगत आहेत. यावरुन आमचा खात्रीपूर्वक आरोप आहे की, महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली किवा महाराष्ट्र सरकारच्या यंत्रणेच्या देखरेखीखाली हे एजट फिरता आहेत. यामुळे तरुण पिढीचे मनोबल घसरले आहे. तरुणाईला न्याय देण्यासाठी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्याकडून या प्रश्नाला वाचा फोडून तरुणाईला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे मत डॉ. चौधरी यांनी मांडले.

Protected Content