चाळीसगाव, प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी “आर्सेनिक अल्बम” या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गोळ्यांचे पॅकिंग सुरू असून रविवारी खासदार उन्मेशपाटील यांनी त्याठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. प्रशासनाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे जिल्ह्यात कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी स्वयंसेवकांची मोठी फळी कार्यरत आहे. खासदार उन्मेश पाटील यांनी नेहरू युवा केंद्राच्या कार्याची माहिती घेतली. जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर व जिल्हा युवक प्रतिनिधी चेतन वाणी, केंद्रातील सर्व उपक्रमांची माहिती खासदार उन्मेश पाटील यांना दिली. यावेळी भूषण लाडवंजारी, जय सपकाळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रीय पेट्रोलीयम आणि प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश पाटील यांनी नेहरू युवा केंद्राच्या कार्याचे कौतुक करून भविष्यात अधिक चांगले उपक्रम राबविण्यासाठी नियोजन करण्याचे सुचविले.याप्रसंगी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, रेडक्रॉसचे सचिव विनोद बियाणी, प्रकल्प प्रमुख डॉ.अपर्णा मकासरे, डॉ.रितेश पाटील, रेडक्रॉस पीआरओ स्वप्नील वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.