जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषेदची सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत छत्रपती शाहू महाराज सभागृहात जि. प. अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या सभेचे वैशिष्ट म्हणजे जळगाव जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच काही सदस्य व अधिकाऱ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला.
जिल्हा परिषद सभा आयोजित करण्यात आली होती. यासभेस ज्या सभासदांना प्रत्यक्ष हजर राहता येणार नसेल त्यांना घरूनच ऑनलाईन पद्धतीने हजर राहण्याचे प्रशासनाद्वारे सर्व सदस्यांना कळविण्यात आले. प्रशासनाच्या या उप्रक्रमाचे सर्व सदस्यांनी कौतुक केले. या सभेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कर्मचारी, पोलीस प्रशासन व इतर केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमुखाने पारित करण्यात आला. ग्रामीण भागात कोरोनावर जास्तीत जास्त निधी खर्च करावा हा ठराव मंजूर झाला. चाळीसगाव तालुक्यात बोगस रासायनिक खाते सापडली त्याच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत बोगस खाते-बियाणे जिल्हयात प्रवेश करू नयेत असा ठरवा देखील करण्यात आला. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रकरणात गैरव्यवहार होत असून याबाबत अधिकाऱ्याना इशारा देण्यात आला.पृष्ठभाग दुरुस्तीसाठीचा निधी जिल्ह्याला दोन वर्षात मंजूर झाला आहे. हा निधी खर्च करण्याचा अधिकार डेप्युटी इंजिनिअर याना असतो. मात्र, डेप्युटी इंजिनिअर यांनी हा पैसे कुठे खर्च केला हे कोणाला माहित नसल्याचा आरोप पोपटतात्या भोळे यांनी केला. ज्यांनी हा निधी खर्च केला तो कुठे केला व ज्याने हा निधी खर्च केला नाही त्याने तो का खर्च केला नाही याची चौकशी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याभेला उपजिल्हाध्यक्ष लालचंद पाटील, नंदू महाजन, प्रभाकर पाटील, नाना महाजन, पोपटतात्या भोळे आदी सदस्य प्रत्यक्ष सभागृहात हजर होते. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे हे देखील उपस्थित होते.
</p
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2568848503430529/