जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाबळ येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील १५ शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २२५ खोल्यांचे बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे तर २७८ शाळा खोलींच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यातील १७ शाळांची आदर्शन मॉडेल म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी मराठी शाळेची पटसंख्या वाढलेली दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, शिक्षक आमदार सुधिर तांबे, आमदार शिरीषदादा चौधरी, आमदार अनिल पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह जिल्ह्यातील सत्कारमुर्ती शिक्षक आदी उपस्थित होते.
जाहीर केलेल्या आदर्श शिक्षकांची यादी याप्रमाणे आहे. दर्शना नथ्थू चौधरी, अमळनेर, मनिषा गोकुळ अहिरराव-भडगाव, रविंद्र माणिक पढार- भुसावळ, मनिषा नारायण कचोरे-बोदवड, उत्तम धर्मा चव्हाण-चाळीसगाव विश्वनाथ गोरक्षनाथ पाटील-चोपडा, संजय पोपट गायकवाड-धरणगाव, लक्ष्मण वामन कोळी-एरंडोल, ललिता नितीन पाटील-जळगाव, किर्ती बाबुराव घोंगडे-जामनेर, विजय वसंत चौधरी-मुक्ताईनगर, अरुणा मुकुंदराव उदावंत-पाचोरा, छाया प्रभाकर भामरे-पारोळा, रामराव ज्ञानोबा मुरकुटे- रावेर, समाधान प्रभाकर कोळी- यावल अश्या १५ शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विजेत्यांना सोमवार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी हा पुरस्कार मान्यवरांच्याहस्ते देण्यात आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/377667661231788