जामनेर येथे “उद्योजक विकास’ हा शैक्षणिक कार्यक्रम उत्साहात

जामनेर, प्रतिनिधी | येथील प्रकाश चंद जैन महाविद्यालयात “उद्योजक विकास’ ह्या शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन काल करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना उद्योजक विकासावर मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले.

जामनेर येथील प्रकाश चंद जैन महाविद्यालयात “उद्योजक विकास” या शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन काल २९ डिसेंबर रोजी करण्यात आले. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्रमुख वक्ते पंढरीनाथ पाटील जामनेर तालुका फार्मासिस्ट असोसिएशन व सचिव जितेंद्र ओस्वाल जळगाव डिस्ट्रिक्ट जॉईंट ऑर्गनायझेशन यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ.मयूर भुरट, डी.फार्मसी चे विभाग प्रमुख प्रा.सुनील बावस्कर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात पंढरीनाथ पाटील व जितेंद्र ओस्वाल यांनी उत्तम उद्योजकासाठी लागणारी विविध गुणधर्म जसे की आत्मविश्वास, उत्तम गुणवत्ता, मेहनत, जिद्द, चिकाटी, राहणीमान, व्यवसाय करण्याबद्दल व उद्योग चालू करण्यासाठी लागणाऱ्या अनमोल मार्गदन केले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या उद्योजकातिल पंखांना मार्गदर्शनाचे बळ लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका कांचन महाजन तर आभार प्रा. महावीर संघवी यांनी केले.

 

Protected Content