जामनेर प्रतिनिधी । आद्य शिक्षिका क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला शिक्षक दिन शहरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय सेलच्या वतीने पंचायत समिती समोर साजरी करण्यात आली.
यावेळी पुरोगामी विचाराच्या वारसदारानीं मोठ्या संख्येने हजेरी लावली होती .राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष संदिप हिवाळे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी कांग्रेसच्या प्रदेश सचिव वंदना चौधरी,राष्ट्रवादी भटके विमुक्त सेलच्या प्रदेश सरचिटणीस ऐश्वर्या राठोड़, कविता बोरसे यांनी प्रतिमा पूजन करुण कार्यक्रमाची सुरवात केली.
इतिहास अभ्यासक किशोर तायड़े, डॉ. बाजीराव पाटिल, प्रदिप गायके यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले दाम्पत्य यांच्या सामाजिक परिवर्तनाची यशोगाथा सांगून त्यांच्या कार्याची माहिती सांगितली तर आज महाविकास आघाडि ने महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे जाहिर केले बद्दल आभार मानले .तर आज देशात सर्वच क्षेत्रात महिलांना जे मानाचे स्थान मिळत आहे त्याचे सर्व श्रेय हे क्रांति ज्योति सावित्रीमाई फुले यांना जाते असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध क्षेत्रात ज्या महिलांनि आपले योगदान दिले होते त्यांची माहिती घेऊन आज त्या महिलांना प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले यात प्रियंका अनिल निकम, कविता प्रल्हाद बोरसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विलास राजपूत, माधव चव्हाण ,योगेश पाटिल, अर्जुन पाटिल, राजू नाईक, नटवर चव्हाण, अमोल पाटील, विनोद माळी, प्रभु झाल्टे, स्वामी पाटिल, विनोद पाटिल, विश्वनाथ शिंदे, किरण चौधरी, भूषण पांढरे, वैभव बोरसे, गणेश कुंवर, व्ही .पी .पाटिल, गजानन गव्हारे,दीपक रिचवाल, डॉ. प्रशांत पाटिल, प्रदिप सोनवणे, दीपक माळी, अशोक चौधरी ,काशीनाथ शिंदे,मनीष पाटिल, सिद्धार्थ सुरवाड़े,शुद्धोधन सोनवणे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.